अभिनेते अक्षयकुमार यांना मातृशोक;केले भावनिक आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता अक्षय कुमारच्या आईचं आज सकाळी निधन झालं. अरुणा भाटिया या मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार घेत होत्या. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हॅन्डलवरून स्वतः ही माहिती दिली. दरम्यान 3 सप्टेंबर रोजी अरुणा यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या आयसीयूमध्ये मध्ये होत्या. तर दुसरीकडे अक्षय युकेमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचं शुटींग करत होता. पण आईची प्रकृती खालावल्यानंतर त्याने शुटींग अर्धवट सोडून आईला भेटण्यासाठी भारतात परतला होता.आज सकाळी त्यांचं निधन झालं.
अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून,माझ्या आईसाठी प्रार्थना करा असे भावनिक आवाहन चाहत्यांना केले होते,त्यावर अनेक चाहत्यांनी प्रार्थना केल्या त्याबद्दल आभार देखील मानले होते,मात्र त्यांच्या आईच्या निधनानंतर अक्षयकुमारने आपल्या एका पोस्ट मध्ये लिहिले की, आई माझ्यासाठी सर्वस्व होती आणि ती जग सोडून गेल्यावर ती आपल्या दुसऱ्या जगात वडिलांकडे गेली आहे.

