चाहत्यांचा ट्रोल; अमिताभ बच्चन यांनी वाढदिवशी तोडला करार!

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडचा महानायक, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज (सोमवार) 79 वा बर्थ-डे.. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला, मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात आले.
अमिताभ यांनी अनेक चित्रपटांतून आपला दर्जेदार अभिनय दाखवून दिलाय. शिवाय अनेक जाहिरातीतही त्यांनी काम केलंय. त्यांच्या कोणत्याही जाहिरातीवर लोक अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र, त्यांच्याकडूनही एक चूक झाली..
▶️ ‘कमला पसंत’सोबत करार थांबवला
अलिकडे अमिताभ व रणवीर कपूर यांनी ‘कमला पसंत’ पान मसाल्याची जाहिरात केली होती. मात्र, अमिताभच्या चाहत्यांना ही गोष्ट आवडली नाही. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अखेर आपल्या वाढदिवशी त्यांनी कमला पसंत कंपनीसोबतचा करार संपवित असल्याचे जाहीर केले आहे.
अमिताभ यांनी आपल्या ब्लाॅगमध्ये म्हटले आहे, की ‘कमला पसंद’सोबतच्या करारातून गेल्या आठवड्यात बाहेर पडलो. ही जाहिरात सरोगेट जाहिरातीत येत असल्याचे माहित नव्हते.’ अमिताभ यांनी ब्रँडसोबतचा करार संपवला असून, घेतलेले पैसे परतही केले आहेत.