कॅन्सरच्या उपचाराची औषधे होणार स्वस्त!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रजाराज्य न्यूज
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सुधारित औषध यादी जाहीर केली आहे, यामध्ये कॅन्सरसह अन्य महत्वाच्या औषधांच्या किंमतीत घट केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.या यादीत तब्बल ३८४ औषधांचा समावेश असून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही यादी जाहीर केली आहे.
नव्या सुधारित यादी दरानुसार आता अँटिबायोटिक्स, कॅन्सर व इतर प्रतिबंधित लशी स्वस्त होणार आहे. याव्यतिरिक्त अंतःस्रावी, गर्भनिरोधक औषधी, श्वसन व नेत्रविकार संबंधित औषधी तसेच हृदय व रक्तनलिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक औषधी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त मुपिरोसिन, इव्हरमॅक्टिन यांसारखी संसर्गाला प्रतिरोध करणारी औषधे तसेच अन्य ३४ प्रकराची औषधे देखील स्वस्त होणार आहे.
नव्या यादीत औषधांची २७ श्रेणीमध्ये मांडणी केली गेली असून, यामधील जास्तीत जास्त औषधी ही गंभीर व अतिगंभीर आजारांवर गुणकारीरीत्या कार्य करणारी आहे.