सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी;1 जुलै पासून कार्यवाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम २०२१ जारी केला आहे
यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती, विक्री, साठवण तसेच वाहूतक करण्यास बंदी असेल त्यानुसार यावर्षी 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात येईल,असे केंद्र सरकारने सांगितले .
नव्या नियमांनुसार 1 जुलै 2022 पासून पॉलिस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह सिंगल यूज प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असेल.
यामध्ये झेंडा, फुगे, आईसक्रीम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉल यांचे उत्पान करण्यास बंदी असेल.
तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, स्वीट बॉक्स, इन्विटेशन कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवरील प्लास्टिकचे रॅप अशा वस्तूंची निर्मिती करण्यासही बंदी असेल,असे केंद्र सरकारने सांगितले.