अवकाळीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी

0

तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई खात्यात जमा करण्याची दिली ग्वाही

अमळनेर-मतदारसंघात २६ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतपीक व फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने या नुकसानाची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी पाहणी केली.
विशेष म्हणजे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची ग्वाही त्यांनी शेतकरी बांधवाना दिली.मुंबई येथील बजेट अधिवेशन आटोपून काल शनिवारी मतदार संघात झाल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांनी सर्व कार्यक्रम व इतर भेटी बाजूला ठेऊन आधी शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पाहणी दौऱ्यावर निघून पारोळा तालुक्यातील हिवरखेडे, मोंढाले, करंजी, पिंपळभैरव, बहादरपुर, शिरसोदे, शेवगे बु., महाळपुर, कंकराज, भिलाली, कोळपिंप्री, रत्नापिंप्री, शेळावे खु., शेळावे बु. या गावांना भेट दिली. शिवाय अमळनेर तालुक्यातील कन्हेरे, सावाने, ढेकु, हेडावे, येथील शेतात व फळबागेत प्रत्यक्ष जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांचे सांत्वनही त्यांनी केले आणि लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई खात्यात जमा करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी मंत्री पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. संभाजीराजे पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भागवत पाटील, राष्ट्रवादी अमळनेर विधानसभा प्रमुख प्रा. सुरेश पाटील,पारोळा पंचायत समिती माजी सभापती जितेंद्र पाटील, उपसभापती चंद्रकांत पाटील, सतीश पाटील, कांकरजचे सरपंच राजाराम शिंदे, सुनील वानी, नंदू वाणी, पारोळा तहसीलदार उल्हास देवरे, पारोळा तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय दामले यांच्यासह महसूल,कृषी, वीजमंडळ, पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!