राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी सौ.रिताताई बाविस्कर यांची निवड

अमळनेर (प्रजाराज्य न्यूज प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार तसेच मदत व पुर्नवसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच जळगाव जिल्हा बॅकेचे चेअरमन आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या सहकार्याने 14 रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी सौ.रिताताई भुपेंद्र बाविस्कर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे आदी उपस्थित होते..
तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय विभागातील पदाधिका -यांनी प्रवेश घेऊन ग्रंथालय विभागाचे संतोष दगडगावकर (प्रदेश कार्याध्यक्षपदी), प्रशांत लोंढे (प्रदेश समन्वयक पदी), दिपक जगताप (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी), राहुल पाटील (प्रदेश उपाध्यक्षपदी), सय्यम नबी (प्रदेश सरचिटणीस पदी), प्रभु नारायण उरडवडे (प्रदेश उपाध्यक्ष पदी) निवड करण्यात आली…
याप्रसंगी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याबद्दल सर्वांचे स्वागत करण्यात आले तसेच सौ.रिताताई बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले की, मी माझी जबाबदारी तन-मन धनापासून पूर्ण करेल व संघटना वाढवेल.