एक्स्प्रेस वे वरील वाहनांची वेग मर्यादा वाढणार!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एक्स्प्रेस वे वरील वाहनांच्या वेग मर्यादेत वाढ करून ती 140 किलोमीटर प्रति तास करण्याचा विचार आहे.यासंबंधी विधेयक लवकरच संसदेत सादर केले जाईल, असे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
नितीन गडकरी म्हणाले मला असे वाटते कि,चार लेन असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर वेग मर्यादा कमीत कमी 100 किलोमीटर प्रति तास असली पाहिजे.
तर दोन लेन असलेल्या मार्गांवर आणि शहरी रस्त्यांसाठी वेग मर्यादा 80 किलोमीटर प्रतितास आणि 75 किलोमीटर प्रति तास असली पाहिजे.
तसेच एक्स्प्रेस वे वर वाहनांची वेग मर्यादा वाढवून 140 किलोमीटर प्रतितास केली पाहिजे, यासंबंधी लवकरच संसदेत विधेयक देखील सादर केले जाणार असेही ते म्हणाले.