ओ शेठ! नंतर ओ सर! नाही पडणार तुमचा विसर!! हे गाणं होतंय तुफान व्हायरल..

कृषिकन्या म्हणून रातोरात प्रसिद्ध झालेली लहान मुलगी “कृपा वाकचौरे” हिने ओ शेठ! ह्या गाण्यावर नृत्य केलं त्या व्हिडिओने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला होता. ओ शेठ गाणं काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालं होत. ह्या गाण्याला देखील प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. अनेक ठिकाणी आपल्याला हे गाणं सर्रास ऐकायला मिळत. अनेक लोक आज ह्या गाण्यावर आपले व्हिडिओ बनवून सोशिअल मीडियावर टाकलेले पाहायला मिळतात. ह्या गाण्याचे बोल संगीत आणि स्टाईल ह्या गाण्याला खास बनवते. ऐकणाऱ्याला लगेच ह्या गाण्याची भुरळ पडते आणि गाणं ऐकताच ओठ हि पुटपुटायला लागतात.
आता ह्याच गाण्याच्या तालावर एका शाळकरी मुलाने ओ सर! नाही पडणार तुमचा विसर!! हे गाणं गायलं आहे. कोरोना काळात लहान मुलांना आपल्या शाळेची कशी आठवण येते असंच चित्र हे गाणं ऐकल्यावर तुम्हालाही समजेल. ह्या मुलाचा आवाजही खूप सुंदर आहे, त्यामुळे हे गाणं ऐकायला देखील खूप चांगलं वाटत. ओ शेठ नंतर आता हे गाणं तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळते. गाण्यातील हा मुलगा नक्की कोण आहे हे अजून समजले नसले तरी त्याने म्हटलेल्या ह्या गाण्याचं सर्व जण कौतुक करताना पाहायला मिळतात. अनेकांनी ह्या मुलाचे आभार देखील मानलेले पाहायला मिळतात. विशेष म्हणजे ह्या मुलाने “अपना टाइम आयेगा!” असं लिहलेला शर्ट परिधान केला आहे. मुलांना ह्या महामारीच्या काळात अनेक अडचणींना समोर जावं लागतंय. अनेकजण आज महामारीच्या काळात महागाईला त्रासले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हे सर्व सुस्थित देखील होतील पुन्हा नोकऱ्या हि मिळतील पण लहान मुलांना ज्या वयात शिक्षणाचे धडे गिरवायचे असतात ती वेळ निघून जायला नको. सर्वांकडे मोबाइल असतील असं नाही ज्यांना एकवेळचे अन्न नीट मिळत नाही त्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना किती अडचणींना सामोरे जावे लागत असेल ह्याचा विचार देखील करवत नाही.