‘रामायण’ येणार मोठ्या पडद्यावर!

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय संस्कृतीचे दोन शाश्वत आधारस्तंभ म्हणजे, रामायण नि महाभारत..! छोट्या पडद्यावरुन ही दोन्ही महाकाव्ये मालिकांच्या रुपाने भारतीयांच्या घराघरांत पोचल्या. आता ‘रामायण’ चित्रपट स्वरुपात मोठा पडदा व्यापण्यासाठी येत आहे.
रामायण पडद्यावर साकारण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, रामानंद सागर यांच्या मालिकेची सर कोणलाच आलेली नाही. मात्र, प्रसिद्ध निर्माते मधू मंटेना यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचा विडा उचलला आहे. थ्रीडी प्रकारात ते हा चित्रपट बनवित असून, त्याचं बजेट 750 कोटींपेक्षा जास्त असल्याचे समजते.
▶️ हृतिक-रणबीरला जास्त मानधन
मंटेना यांच्या या चित्रपटात राम म्हणून रणबीर कपूर, तर रावणाच्या भूमिकेत हृतिक रोशन झळकणार आहेत. त्यासाठी या दोन्ही कलाकारांना प्रत्येकी 75 कोटी रुपये इतके तगडे मानधन मिळणार आहे. सीतेच्या भूमिकेत दीपिका पदूकोण हिचे नाव समोर येतेय.
‘दंगल’ फेम दिग्दर्शक नीतेश तिवारी हेच रामायण चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. अतिशय भव्य-दिव्य स्वरुपात हा चित्रपट रसिकांसमोर येणार असल्याचे समजते.
▶️ ‘आदिपुरुष’ आधी येणार!
दरम्यान, या चित्रपटापूर्वीच सैफ अली खान दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यात रावणाच्या भूमिकेत स्वत: सैफ अली खान, तर रामाची भूमिका ‘बाहुबली’ फेम प्रभास साकारणार आहे.