ओमायक्रॉनपासून बचावासाठी उपाय योजना

दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमायक्रॉनने जगभर खळबळ उडाली आहे.. कारोनाच्या ‘डेल्टा’ व्हेरिएंटपेक्षाही तो अधिक धोकेदायक असल्याचे सांगितले जाते. ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये आतापर्यंत अनेक म्युटेशन आढळल्याची जागतिक आरोग्य संघटनेची माहिती आहे..
दरम्यान, भारतातील कर्नाटकमध्येही ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर या नव्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञांनी उपाय सांगितले आहेत. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या..
▶️ कोविड लसीकरण –
भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. या विषाणूपासून बचावासाठी तातडीने कोरोनाच्या दोन्ही लसी घ्या.
▶️ मास्कचा वापर –
कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. नागरिकांनी बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.
▶️ गर्दीपासून दूर राहा –
घराबाहेर पडल्यावरही शक्यतो गर्दीत जाणं टाळा. अगदी पर्याय नसेल, तरच गर्दीच्या ठिकाणी जा. कारण, गर्दीतूनच संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळा.
▶️ कोविड टेस्ट–
कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तातडीने कोरोना टेस्ट करा. कारण, त्यामुळे या आजारावर लवकर उपचार सुरू करता येतील व त्याचा लोकांमध्ये प्रसारही होणार नाही.
▶️ विलगीकरण –
कोविडची लक्षणे आढळून आल्यास, कोविडबाधित निघाल्यास स्वत:ला सगळ्यांपासून लांब ठेवा.