सावधान !भारतात आढळले, ओमिक्रॉनचे 2 रुग्ण!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतामध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी नुकतीच दिली आहे.
दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 66 आणि दुसरा रुग्ण 46 वर्षे वयाचा आहे.
देशात सध्या कोरोना लशीच्या दुसऱा डोस देण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. युरोपमध्ये मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्के रुग्णसंख्या युरोपात असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. आतापर्यंत 29 देशांमध्ये 373 ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण दिसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.