कुणबी पाटील समाज लोकरक्षक भरती अभ्यासक्रमाला पोलीस अधिकाऱ्यांची भेट!

सुरत, गुजरात,प्रतिनिधी (निवृत्ती पाटील)
5 डिसेंबर रोजी कुणबी पाटील समाज द्वारा आयोजित लोक रक्षक भर्ती फ्री अभ्यासक्रमाला गुजरात राज्यातील 2015 ते आतापर्यंत गुजरात पोलिस मध्ये भर्ती झालेले सुरत येथील विविध पोलीस स्टेशन मध्ये आपले कर्तव्य निभावणारे पोलीस कॉन्स्टेबल राहुल संजय लांडगे, संदीप मच्छिंद्र पाटील, मुकेश रविंद्र पाटील ,कल्पेश बापुराव पाटील, संदीप सदाशिव पाटील, राजेश तुकाराम मराठे , धनंजय सोलंकी, समाधान पाटील, विजय प्रकाश भाई केळकर मनोज निंबा पाटील अजय मोहनसिंघ गिरासे यांच्यासह समाजातील युवा उद्योजक सम्राट पाटील आणि सोनू पाटील यांनी भेट दिली . सर्व पोलीस अधिकारी यांनी 2015 ते आता पर्यंत झालेल्या पोलीस भरती च्या शारीरिक आणि लेखी परीक्षा संबधी मार्गदर्शन दिले त्यात खास करून पेपर लिहितांना घ्यावयाची काळजी तर अभ्यास कसा करावा याबत मार्गदर्शन केले तर शारीरिक परीक्षा साठी रनिंग ची तयारी कशी करावी आणि मैदानावर कश्या प्रकारे रनिंग करावी याबाबत मार्गदर्शन केले तर युवा उद्योजक सम्राट पाटील आणि सोनू पाटील यांनी गुजरात राज्यात प्रथमच अश्या प्रकारे गरजू युवकांसाठी अश्या प्रकारचे फ्री अभ्यासवर्ग चे आयोजन केल्या बद्दल आयोजक दिपक आर पाटील भास्कर आर पाटील सुनिल पाटील आणि चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त केले तर या संधी चा भरपुर फायदा घेऊन पोलिस भर्ती मध्ये सफल होण्याचे सर्व युवक युवतींना आव्हान केले आणि सफल व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. आणि सर्वांना आपल्या परीने शक्य होईल तेवढे तन मन आणि धन सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच या अभ्यासक्रमात सहयोग देणारे सर्व शिक्षकांचे आभार मानले .
आलेल्या सर्व पोलिस अधिकारी आणि युवा उद्योजक यांचे दिपक पाटील , भास्कर पाटील सुनील पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनी आभार व्यक्त केले .
