580 वर्षांनी होतेय सर्वात मोठे खंडग्रास चंद्रगहण!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) यंदाच्या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण आज 19 नोव्हेंबर रोजी होत आहे. सर्वात जास्त काळ चालणाऱ्या चंद्रग्रहणांपैकी हे एक असल्याचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात. तब्बल 580 वर्षांनंतर इतके मोठे चंद्रग्रहण होत आहे.. याआधी 18 फेब्रुवारी 1440 रोजी इतके मोठे चंद्रग्रहण झाले होते.
भारतातील काही भागात हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे. शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा असल्याने या दिवसाला मोठे महत्व आहे.
▶️ चंद्रग्रहण कुठे दिसेल?
भारताच्या ईशान्य भागात हे चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, तसेच उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात हे चंद्रग्रहण दिसेल.
▶️ चंद्रग्रहणाची तारीख आणि वेळ
खंडग्रास चंद्रग्रहण शुक्रवारी (ता.19 नोव्हेंबर) सकाळी 11.34 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5.33 वाजता संपेल., म्हणजेत त्याचा एकूण कालावधी 3 तास 26 मिनिटांचा असणार आहे.
▶️ कधी होते खंडग्रास चंद्रग्रहण?
सूर्य, पृथ्वी नि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्याभोवती फिकट उपछाया असते. पृथ्वीच्या गडद सावलीतून चंद्राचा प्रवास झाल्यास खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते.