पंतप्रधान किसान योजनेच्या नियमांत केला बदल!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरूवात केली आहे. ही योजना मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपयांचे वार्षिक अनुदान दिले जाते. हे पैसे तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये असे 9 हप्ते जमा करण्यात आले आहे. मात्र आता या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत. PM किसान सन्मान निधी ही योजना सुरु झाल्यापासून अनेक बोगस शेतकरी योजनेचे पैसे लाटत असल्याचा प्रकार समोर आला होता. हा गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या नियमांत काही बदल केले आहेत.
▶️ केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार,
केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी आता रेशनकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार लाभार्थी कुटुंबांना आपल्या रेशनकार्डसह आधार कार्ड, बँक पासबूक आणि PM-KISAN संकेतस्थळावरील घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे जमा करावी लागतील.
दरम्यान या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 9 हप्ता जमा झाले असून आता दहावा हप्ता नेमका कधी मिळणार याची देशभरातील शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहावा हप्ता साधारण 15 डिसेंबरला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात.
▶️ या शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा लाभ
उत्तर प्रदेशातील बरेलीत 55,243 अपात्र शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे लाटत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार नाहीत. सप्टेंबर महिन्यात जिल्हा स्तरावर तपास करण्यात आला. ज्यामध्ये ही फसवणूक उघडकीस आली. या प्रकरणात अपात्रांना जिल्हा कृषी विभागाच्या वतीने वसुली नोटीसा दिल्या जात आहेत. वसुलीनंतर हा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होईल.
▶️ पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी काय कराल?
तुम्हाला प्रथम पंतप्रधान किसान सन्मान योजना या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
आता ‘फार्मर्स’ कॉर्नरला जा.
येथे आपल्याला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
आधार क्रमांक समाविष्ट करावा लागणार आहे.
त्याच वेळी कॅप्चा कोड घालून राज्याची निवड करावी लागते आणि मग पुढची प्रक्रिया ही करावी लागणार आहे.
आपल्याला आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती या स्वरूपात भरणे आवश्यक आहे.
बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती देखील भरावी लागेल.
मग तुम्ही फॉर्म सादर करू शकता.