आधार कार्डचा गैरवापर केल्यास, होणार 1 कोटींचा दंड!

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आधार कार्डचा गैरवापर करणाऱ्यांवर आता 1 कोटी रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाला (यूआयडीएआय) तसा अधिकार देण्यात आलाय. या कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
आधीच्या नियमानुसार, आधार कार्डचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार ‘यूआयडीएआय’ला नव्हता. तसा अधिकार ‘यूआयडीएआय’ला देण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये ‘आधार आणि अन्य कायदा (सुधारणा)’ आणला. त्याची अधिसूचना 2 नोव्हेंबरला काढण्यात आली.
▶️ वरिष्ठ अधिकारी नेमला जाणार
‘आधार’च्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी ‘यूआयडीएआय’ अधिकाऱ्यांची नियुक्ती करू शकते. केंद्र सरकारमध्ये संयुक्त सचिव किंवा त्याहून वरच्या पदावर कार्यरत असणारी व्यक्ती हा अधिकारी असेल. त्याच्याकडे 10 वर्षे किंवा त्याहून अधिक अनुभव असेल. प्रशासकीय, तांत्रिक बाबींची त्यास माहिती असेल.
आधार नियमांचे उल्लंघन झाल्यास हा अधिकारी दोषींना 1 कोटीपर्यंतचा दंड ठोठावू शकतो. ‘यूआयडीएआय’कडून त्याला तसे अधिकार देण्यात येणार आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!