सुरत येथे कुणबी पाटील समाज द्वारा लोकरक्षक भरतीसाठी विनामूल्य शिकवणी वर्ग

सुरत, गुजरात(प्रतिनिधी)निवृत्ती पाटील
गुजरात राज्यात नुकत्याच जाहीर झालेल्या लोकरक्षक दलासाठी 10475 जागांसाठी इच्छुक युवक युवतींसाठी कुणबी पाटील समाज सुरत द्वारा विनामूल्य शिकवणी वर्गाची सुरुवात करण्यात आली . यामध्ये पहिल्या दिवशी 15 मुली आणि 50 मुले असे एकूण 65 युवक युवतींनी आपली नोंदणी करून शिकवणी वर्ग साठी सुरुवात केली .गुजरात मध्ये मराठी समाज खुप मोठ्या संख्येने आणि बऱ्याच वर्षांपासून वास्तव्य करत आहे . त्यात गुजरात राज्यात पोलिस कॉन्स्टेबल पासून तर आय पी एस पर्यंतच्या विविध पदांवर मराठी व्यत्तींनी सेवा दिली आहे आणि देत आहेत.परंतु सध्या स्पर्धेचे युग असल्याने आणि महाराष्ट्रीयन समाज सुरत मध्ये उदरनिर्वाह साठी असल्याने अनेक मध्यम वर्गीय तरुणांना पोलिस भरती बाबतचे मार्गदर्शन मिळत नाही,आणि मिळाले तरी अशा भरतीच्या अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या शिकवणी वर्गाची फी साधारण 15 ते 20 हजार रुपये पर्यंत असते आणि ती फी देणे शक्य नसल्यामुळे बरेच तरुण पोलिस दलात इच्छुक असुनही याकडे दुर्लक्ष करतात.त्यांची ही असमर्थता पाहून समाजातील समाज प्रमुख दिपक आर पाटील,भास्कर आर पाटील,चंद्रकांत पाटील, सुनील पाटील यांनी अश्या तरुणांना विनामूल्य शिकवणी मिळावी यासाठी सुरवात केली . शिकवणी वर्गाच्या जागेसाठी महेंद्र पाटील सर यांनी दिंडोली येथे मधुरम एज्युकेशन हब मध्ये व्यवस्था करून दिली तर मधुरम एज्युकेशन हब चे संचालक कल्पेश पटेल यांनी स्वतः कार्यक्रमात उपस्थित राहुन सर्व व्यवस्था करून दिली. तसेच पुढे पण 90 दिवस चालणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी पुर्ण व्यवस्थेची जवाबदारी पण घेतली.शिकवणी वर्गासाठी योगेश पाटील, मंगेश पाटील,किशोर सोनवणे, कैलास माली, पियुश व्यास आणि सेवा निवृत्त पोलिस इन्स्पेक्टर ढवळे साहेब यांनी शिक्षण देण्याची जवाबदारी घेतली .
कार्यक्रमाच्या शेवटी महानुभवांचे दिपक आर पाटील यांनी आभार मानले तसेच शिकवणी साठी आलेल्या तरुण तरुणींच्या डोळ्यांमध्ये पोलिस भरतीसाठीची चमक पाहून त्यांना नियमित हजर राहुन अभ्यास पूर्ण कराण्यासाठी आणि भरतीसाठी शुभेच्छा दिल्या.
