केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट;महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

0

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 3 % वाढ करण्यास मंजूरी दिली आहे. देशातील 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोरोनामुळे अर्थ मंत्रालयाने महागाई भत्त्यातील वाढ 30 जून 2021 पर्यंत रोखली होती. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत 17 टक्केच महागाई भत्ता दिला जात होता.
केंद्र सरकारने 1 जुलैपासून केंद्रीय सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता व महागाई आराम (DR) दर 11 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के झाला. त्यानंतर आता पुन्हा 3 टक्के वाढ केल्याने 31 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
▶️ बेसिक सॅलरीवर 31 % महागाई भत्ता
केंद्रिय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महागाई भत्त्यात 3 % वाढ झाल्याने सातव्या वेतन आयोगानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक सॅलरीवर 31 % महागाई भत्ता मिळणार आहे. त्यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!