1 डिसेंबरपासून चॅनेल्स पाहण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार!

0

मुंबई (वृत्तसंस्था) टीव्ही पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, कारण, येत्या 1 डिसेंबरपासून आवडती टीव्ही चॅनेल्स पाहण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. आघाडीचे ब्रॉडकास्टिंग नेटवर्क वायाकॉम, झी, स्टार आणि सोनीने त्यांची काही चॅनेल्स त्यांच्या बुकेतून बाहेर काढत किंमती वाढविल्या आहेत.
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) मार्च 2017 मध्ये चॅनेलचा कमाल दर 19 रुपये निश्चित केला होता. त्यानंतर ‘ट्राय’च्या नवीन टेरिफ ऑर्डरमध्ये ते 12 रुपये निश्चित केले आहेत. एवढ्या रकमेत ग्राहकांना चॅनेल्स देऊ करणे, नेटवर्क कंपन्यांना परवडणारे नाही.
परिणामी, ब्राॅडकास्ट नेटवर्कने त्यांचे काही लोकप्रिय चॅनेल्स बुकेमधून बाहेर काढून त्यांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये क्रीडा, प्रादेशिक आणि सामान्य मनोरंजन श्रेणीतील अनेक वाहिन्यांचा समावेश आहे.
▶️ चॅनेलचे नवीन दर
▪️ ‘सोनी नेटवर्क’ने 26 पैकी 13 चॅनेल बूकेतून बाहेर काढले आहेत.
सेट मॅक्स एचडी- 30 रुपये
इतर सर्व एचडी चॅनेल- 28 रुपये
सेट इंडिया- 24 रुपये
सोनी टेन 1 व 2 एचडी- 25 रुपये
▪️ ‘स्टार टीव्ही नेटवर्क’ने 62 पैकी 12 चॅनेल बूकेतून बाहेर काढले.
स्टार प्लस- 23 रुपये,
इतर 7 एचडी चॅनेल- 25 रुपये
स्टार स्पोर्टस् व स्टार स्पोर्टस् सिलेक्ट- 1 साठी 23 रुपये.
▪️ ‘झी’ने 67 पैकी 7 चॅनेल बुकेतून बाहेर काढले.
सर्वात प्राईम चॅनेल झी टीव्हीसाठी 22 रुपये लागतील
▪️ ‘वायकाॅम’ने लाेकप्रिय कलर्स वाहिनीला बुकेतून बाहेर काढले. कलर्स एसडीसाठी 21, तर एचडीसाठी 23 रुपये लागतील.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!