33 टक्के टॅक्स म्हणजे निव्वळ खंडणी;माजी अर्थमंत्र्यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ग्राहक पेट्रोलसाठी 102 रुपये मोजत आहेत. यातील 42 रुपये तेल कंपन्यांना, केंद्र सरकारला 33 रुपये, राज्य सरकारला 24 रुपये कर म्हणून दिले जातात. त्याच वेळी, 4 रुपये देखील डीलरकडे जातात, अशी माहिती त्यांनी दिली.
देशातील वाढत्या इंधनाच्या किमतींबाबत माजी अर्थमंत्री पी चिदंबरम म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती केंद्र सरकारने करांच्या माध्यमातून वाढवल्या आहेत. हे म्हणजे ग्राहकांकडून खंडणी उकळण्यासारखं आहे. चिदंबरम यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी “पेट्रोलच्या किंमतीपैकी एक तृतीयांश रुपये ग्राहक भरतात. हा संपूर्ण केंद्र सरकारचा कर आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूवर 33 टक्के कर लादणे म्हणजे खंडणी आहे, असे चिदंबरम म्हणाले.