करामध्ये कपात;खाद्य तेल होणार स्वस्त!

0

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) केंद्र सरकारने सर्व सामान्यांना दिलासा देण्यासाठी पाम आणि सुर्यफूल तेलावरील कृषी उपकर आणि सीमा शुल्कात कपात केली आहे. याआधी उपभोक्ता मंत्रालयाने तेल आणि तिलहनवर साठ्याच्या मर्यादेचा आदेश जारी केला होता. साठ्याची मर्यादा 31 मार्च 2022 पर्यंत लागू असणार आहे. राज्यांना आदेशाचे सक्तीने पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सरकारच्या या निर्णयानुसार, कच्च्या पाम तेलावरील शुल्क 8.25% (आधी 24.75%), आरबीडी पामोलिन 19.25 (आधी 35.75), आरबीडी पाम तेलावर 19.25 (आधी 35.75), कच्च्या सोया तेलावरील शुल्क कमी करण्यात आले 5.5 (आधी 24.75) आहे. सोया तेलावर 19.5 (आधी 35.75), कच्च्या सूर्यफूल तेलावर 5.5 (आधी 24.75) आणि रिफाईंड सूर्यफूल तेलावर 19.25 (आधी 35.75) शुल्क कमी केल्यामुळे, सीपीओच्या किंमतीत प्रतिटन 14,114.27 रुपये, आरबीडीची किंमत प्रतिटन 14526.45 रुपयांनी, सोया तेल 19351.95 रुपये प्रति टन रुपयांनी स्वस्त झाले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर खाद्यतेलात 15 रुपयांची कपात होऊ शकते.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डने अधिसूचनेत म्हटले आहे की, शुल्कात कपात 14 ऑक्टोबरपासून प्रभावी होईल आणि 31 मार्च 2022 पर्यंत लागू असेल. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
गेल्या महिन्यात 11 सप्टेंबर रोजी पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क कमी करण्यात आले होते. तर कच्च्या पाम तेलावरील मूलभूत आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले. त्याचबरोबर कच्च्या सोया तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कही 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!