देशात पेट्रोल,डिझेलचा पुन्हा भडका!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी, बुधवारी किमती स्थिर होत्या. आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत 35-35 पैशांची प्रति लिटर वाढ झाली आहे. महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य माणूस चांगलाच होरपळून निघत आहे.
▶️ पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
▪️ पुण्यात पेट्रोलची किंमत 110.50 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलची किंमत 99.60 रुपये प्रति लिटर आहे.
▪️ मुंबईत पेट्रोलची किंमत 110.75 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलची किंमत 101.40 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
▪️ दिल्लीत पेट्रोल 104.79 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर डिझेलची किंमत 93.54 रुपये आहे.
▪️ पाटनामध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल 108.04 प्रति लिटर, तर डिझेल 100.07 प्रति लिटरनं विकलं जात आहे.
▪️ कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 105.43 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलचे दर 96.63 रुपये प्रति लिटर आहेत.
▪️चेन्नईमध्ये पेट्रोल 102.10 रुपये प्रति लिटर दरानं, तर डिझेल 97.93 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
▪️चंडीगढमध्ये पेट्रोल 100.86 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.34 रुपये प्रति लिटरनं विकली जात आहे.
(वरील किंमतीत आणि तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किंचित फरक असू शकतो)
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचे नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि इतर काही गोष्टी जोडून जवळपास दुप्पट होतात. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे.