1 ऑक्टोबर पासून हे होणार बदल!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) 1ऑक्टोबरपासून बँक, पगार, गॅस दरात काही बदल होणार आहेत. त्याचा सामान्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. नेमक्या कोणत्या गोष्टी बदलणार आहेत, याबाबत जाणून घेऊ या..
▶️ पेन्शन नियमांमध्ये बदल
डिजिटल लाईफ सर्टिफिकेटशी संबंधित नियम 1 ऑक्टोबरपासून बदलणार आहे. त्यानुसार ८० वर्षांपेक्षा अधिक वयाचे निवृत्तीवेतनधारक प्रमुख पोस्ट ऑफिसच्या जीवनप्रदान केंद्रात डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील, त्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे काम टपाल कार्यालयाद्वारे सुरू होणार आहे.
▶️ जूने चेकबूक चालणार नाही
पुढील महिन्यांपासून ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँकेचे जूने चेकबून चालणार नाहीत. इतर बँकांमध्ये झालेल्या विलीनीकरणामुळे या बॅंकेच्या खातेधारकांच्या खाते क्रमांक, IFSC आणि MICR कोडमध्ये बदल झालाय. त्यामुळे या बँकांची सर्व जूने चेकबूक अवैध ठरतील.
▶️ ऑटो डेबिट कार्डच्या नियमात बदल
क्रेडिट-डेबिट कार्डवरून ऑटो डेबिटसाठी आरबीआयने नवा नियम लागू केलाय. त्यानुसार ग्राहक मंजूर करेपर्यंत ऑटो डेबिट होणार नाही. बँकेला कोणतेही ऑटो डेबिट करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी ग्राहकांना 24 तास अगोदर सूचना पाठवावी लागेल. ग्राहकाच्या खात्यातून पैसे कन्फर्म झाल्यावरच डेबिट केले जातील.
▶️ गुंतवणूक नियमांमध्ये बदल
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी बाजार नियामक सेबीने नवा नियम केलाय. अॅसेट अंडर मॅनेजमेंट, अर्थात म्युच्युअल फंड हाऊसमध्ये काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असेल. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण वेतनाच्या 10 टक्के रक्कम म्युच्युअल फंडाच्या युनिटमध्ये गुंतवावी लागणार आहे.
▶️ गॅस दरात बदल
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती एलपीजी आणि व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किमती निश्चित केल्या जातात. त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून गॅसच्या किमतीत बदल होईल.