18 वर्षांखालील मुलांना सीमकार्ड नाही मिळणार; दूरसंचार विभागाने नियमात केले बदल!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दूरसंचार विभागाने (DoT) मोबाईल सिम कार्ड संबंधित नियमात बदल केले आहेत. बनावट सिम कार्डला लगाम लावण्यासाठी DoT ने मोबाईल सिम कार्ड देण्याच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. त्यासाठी नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
देशात कोणत्याही 18 वर्षांखालील मुलाला सीम कार्ड मिळणार नाही. तसेच ज्या व्यक्तींची मानसिक स्थिती ठिक नाही, त्यांनाही सिम कार्ड मिळणार नाही. तसे आढळल्यास टेलिकॉम ऑपरेटरला दोषी मानले जाणार आहे.
▶️ नागरिकांना घरबसल्या मिळणार सीमकार्ड
दूरसंचार विभागाने सिम कार्ड घेण्यासाठी eKYC आणि Self KYC प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार नागरिकांना घरबसल्या नवे मोबाईल कनेक्शन मिळणार आहे. सोबत सिम कार्ड पोर्ट करण्याची प्रक्रियाही सोपी होणार असून, त्यासाठी नागरिकांना 1 रुपया शुल्क द्यावे लागणार आहे.
▶️ CAF फाॅर्म भरावा लागणार
ग्राहकांना नवे सिम कार्ड घेण्यासाठी ‘कस्टमर एक्युजिशन फॉर्म’ (CAF) भरावा लागेल. त्यात कस्टमर आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये करार होतो. हा करार इंडियन कॉन्ट्रॅक्ट लॉ 1872 अंतर्गत लागू असेल. या कायद्यानुसार कोणताही कॉन्ट्रॅक्ट 18 पेक्षा अधिक वर्षादरम्यान असावा.
▶️ एका व्यक्तीला 12 सिम कार्ड घेता येणार
भारतात एक व्यक्ती जास्तीत जास्त आपल्या नावाने 12 सिम कार्ड खरेदी करु शकतो. त्यात 9 सिम कार्डचा वापर कॉलिंगसाठी केला जाऊ शकतो, तर 9 सिमचा वापर मशीन-टू-मशीन कम्युनिकेशनसाठी करता येणार आहे.