सर्व शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड!

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रत्येक राज्यातील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल. तसेच आता किसान क्रेडिट कार्ड फक्त शेतीपुरते मर्यादित राहणार नाही.
तर पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना देखील या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल तसेच कर्जावरील व्याजासाठी सरकारकडून 2% सबसिडी मिळेल असे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.

▶️ कुणाला मिळेल कार्ड –
शेती, मत्स्यपालन आणि पशुपालन करणारी व्यक्तीला याचा लाभ मिळणार आहे, याचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे आवश्यक आहे.

▶️ असे मिळेल कार्ड –
यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in/ या साईटवर जा.किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करा. हा फॉर्म जमिनीची कागदपत्रे तसेच पिकांच्या तपशीलांसह भरा, नंतर अर्ज सबमिट करा,त्यानंतर आपल्याला बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

▶️ आवश्यक कागदपत्रे –
किसान क्रेडिट कार्डसाठी आपल्याकडे वोटर ID card/ PAN कार्ड/ पासपोर्ट/आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!