LIC ने जारी केली एक महत्वाची सूचना;जाणून घ्या

▶️ पॉलिसीधारकांना त्यांचे पॅन कार्ड पॉलिसीशी जोडणे आवश्यक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जर तुम्ही एलआयसी पॉलिसी घेतली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. एलआयसीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक महत्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. आणि त्यांच्या सर्व पॉलिसीधारकांसाठी ही महत्वाची माहिती आहे. पॉलिसीधारकांना त्यांचे पॅन कार्ड पॉलिसीशी जोडणे आवश्यक आहे.
याबाबतची सविस्तर माहिती एलआयसीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरूनही प्रसिद्ध केली आहे.
सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली आहे. बाजार नियामक सेबीनेही अशाच प्रकारचा नियम निश्चित केला आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पॅन आधारशी जोडण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे एलआयसीला पॅन लिंक करण्यास सांगितले आहे. पाच लाखांपासून दोन कोटींपर्यंत. कर्ज टाटा कॅपिटलची ‘लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड्स’ सुविधा जर तुम्ही अजूनही पॉलिसी पॅनशी जोडलेली नसेल, तर काळजी करू नका.
▶️ तुम्ही ही घरबसल्या ऑनलाईन करू शकता.
१. एलआयसीच्या साइटवर पॉलिसींच्या सूचीसह पॅनचा तपशील द्या.
२. आता तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा. त्या मोबाइल क्रमांकावर एलआयसी (LIC) कडून एक ओटीपी (OTP) येईल, तो प्रविष्ट करा,
३. फॉर्म जमा केल्यानंतर, तुम्हाला यशस्वी नोंदणीचा संदेश मिळेल.
४. आता तुम्हाला कळेल की, तुमचे पॅन पॉलिसीशी जोडले गेले आहे.