ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंटच्या नियमामध्ये होणार मोठा बदल!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) 1ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंटच्या नियमामध्ये मोठा बदल होणार आहे. या नियमानुसार पेटीएम ,फोनपे तसेच बँक यासारख्या प्लॅटफॉर्मला प्रत्येक वेळी ईएमआय हप्ताचे पैसे कापण्यापूर्वी आपल्याला परवानगी द्यावी लागेल, असे RBI ने सांगितले
▶️ ऑटो डेबिट सिस्टम म्हणजे काय ? –
ऑटो डेबिट सिस्टम म्हणजे जर आपण मोबाईल अँप किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये ऑटो डेबिट मोड मध्ये वीज, गॅस, एलआयसी यासारखे खर्च ठेवले असतील.
▪️तर एका विशिष्ट तारखेला खात्यातून पैसे आपोआप कापले जातील,तसेच नवीन नियमानुसार या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.
▶️ रिमाइंड पाठविले जाईल –
नवीन नियमानुसार बँकांना पेमेंट डेटच्या 5 दिवस आधी ग्राहकांच्या मोबाइलवर अधिसूचना पाठवावी लागेल,तसेच एसएमएसमध्ये पेमेंटची तारीख आणि रक्कमची माहिती द्यावी लागेल,असे RBI ने सांगितले आहे.