शिल्पा शेट्टी घेणार नवा निर्णय ? एक पोस्ट केली शेअर!

मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या खूप एकटी पडली आहे. पती राज कुंद्राच्या अटकेनंतर जणू तिच्यावर आभाळ कोसळलं होतं. राज कुंद्राला १९ जुलै रोजी पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यामुळे शिल्पा बराच काळ सोशल मीडिया पासून लांब होती. शिल्पा नेहमीच सोशल मीडिया वर सक्रीय असते. मात्र मध्यंतरीच्या काळात ती काहीशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पासून लांब गेली होती.
मात्र तिने पुन्हा सोशल मीडिया वर कमबॅक केले आहे. अलीकडे ती सोशल मीडिया वर सकारात्मक विचार शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला टाकलेला एक फोटो बराच व्हायरल झाला आहे. तिच्या या पोस्टमुळे शिल्पा काहीतरी नवीन निर्णय घेत असल्याचे तिच्या चाहत्यांना वाटत आहे. या पोस्टद्वारे ती आपले भविष्यातील नियोजन सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
▶️ अशी आहे पोस्ट ⤵️

शिल्पाने अमेरिकन लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकातील एक पान शेअर केले आहे. ‘नवा अंत’ असे या पानावर शीर्षक आहे. ‘भूतकाळात जाऊन कोणालाच नवी सुरुवात करता येत नाही. मात्र कोणीही व्यक्ती वर्तमानकाळात सुरुवात करू शकते आणि एक नवा अंत लिहू शकते.’ असा सुविचार या शीर्षकाखाली देण्यात आला आहे.
या सुविचाराखाली लिहिले आहे, की ‘आपण जे वाईट निर्णय घेतले, ज्या चुका केल्या, काही मित्रांना दुखावलं- याच्यावर विचार करण्यात आपण खूप वेळ घालवू शकतो. कदाचित आपण थोडे अजून स्मार्ट असतो, थोडा अजून धीर धरला असता किंवा थोडे अजून चांगले वागलो असतो तर… आपण कितीही विचार केला तरी आपण भूतकाळ बदलू शकत नाही.’
पुढे यात सांगितले आहे, की ‘पण आपण चांगले निर्णय घेत, जुन्या चुका टाळत, आपल्या आसपासच्या लोकांशी चांगले वागून नवे मार्ग स्वीकारत पुढे जाऊ शकतो. आपल्याला स्वतःचा शोध घेण्याच्या किंवा स्वतःला पुनर्स्थापित करण्याच्या अनेक संधी मिळत असतात.’