20 सप्टेंबर 2021

▶️ यंदाच्या गणेश विसर्जनादरम्यान मुंबईत मोठी दुर्घटना, वर्सोवा येथे समुद्रात पाच मुले बुडाली, दोघे सापडले, तिघे बेपत्ता 

▶️ आयपीएल 2021: चेन्नई सुपर किंग्सकडून मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव; चेन्नईच्या 20 षटकांत 156/6 धावा, प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सच्या 136/8 धावा

▶️ देशातील असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे कार्य वेगाने सुरू, ई-श्रम पोर्टलवर एक कोटीहून अधिक कामगारांची नोंदणी

▶️ भारतात 3,12,119 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,27,07,589 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,45,165 रुग्णांचा मृत्यू

▶️ राज्यात यंदाही मिरवणुकीविना बाप्पाला निरोप; लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन तर पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे साधेपणाने विसर्जन

▶️ श्रीमंतांच्या गाडीत 8 एअरबॅग सर्वसामान्यांच्या गाडीत फक्त 2-3 एअरबॅग का? नितीन गडकरींचा कार निर्मात्या कंपन्यांना सवाल

▶️ महाराष्ट्रात 42,955 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 63,36,887 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,38,518 रुग्णांचा मृत्यू

▶️ अनंत चतुर्दशी दिवशीच तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून घेतला; कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवले

▶️ पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चन्नी यांच्या नावाची घोषणा ; काँग्रेस नेते चरणजीत चन्नी आज सकाळी 11 वाजता घेणार पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

▶️ वॉटर प्यूरीफायर बनवणारी लोकप्रिय कंपनी Kent ने लाँच केला 360 डिग्री फिरणारा सिक्योरिटी कॅमेरा, या मेड इन इंडिया कॅमेऱ्याची किंमत फक्त 4,990 रुपये असणार

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!