▶️ राज्यभरात कोविडचे नियम पाळून घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप, कृत्रिम आणि फिरत्या तलावाला प्राधान्य, लालबागच्या राजाचंही मोठ्या उत्साहात विसर्जन..

▶️ पंजाबला मिळाला नवा ‘कॅप्टन’, सोनिया गांधींकडून पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब.. हरिश रावत यांची माहिती. पंजाबमध्ये 2 उपमुख्यमंत्री असणार.

▶️ IPL 2021, MI vs CSK : 10 बॅट्समन घेऊन चेन्नई मैदानात उतरणार, मुंबईपुढे मोठं चॅलेंज! दुबईमध्ये होणाऱ्या या सामन्यात मोठा स्कोअर होण्याची शक्यता..

▶️ श्रीमंतांच्या गाडीत 8 एअरबॅग सर्वसामान्यांच्या गाडीत फक्त 2-3 एअरबॅग का? नितीन गडकरींचा कार निर्मात्या कंपन्यांना सवाल.. किमान 6 एअरबॅग असाव्यात..

▶️ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपानंतर पुन्हा किरीट सोमय्या चर्चेत. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा सोमय्यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदीचा आदेश. मुंबई पोलिसांकडून सोमय्या स्थानबद्ध

▶️ ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात..सायंकाळी सात वाजता ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रीमिअर. शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त.

▶️ अफगाणिस्तानबाबत अमेरिकेची बाजू घेतल्याची पाकिस्तानला खूप मोठी किंमत मोजावी लागली.. पंतप्रधान इम्रान खान. अमेरिकन खासदारांच्या टीकेला इम्रान खान यांचे उत्तर.

▶️ राज्यसभेच्या सात रिक्त जागांसाठी येत्या ४ ऑक्टोबरला पोटनिवडणुका. भाजपकडून केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल व राज्यमंत्री एल. मुरुगन यांना अनुक्रमे आसाम व मध्य प्रदेशमधून उमेदवारी जाहीर.

▶️ महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे आलबेल.. उर्वरित कार्यकाळ पूर्ण करणार, चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची मुदत संपल्याने राज्यातील सत्तांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.. संजय राऊत

▶️ तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेतनस्तरीय निवड प्रक्रियेद्वारे एच -1 बी व्हिसा निवडीसाठी सध्याची लॉटरी पद्धत बदलण्याचा प्रस्तावित नियम अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने रद्द केला. भारतीयांना फायदा होणार.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!