राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ ;अशी घ्या काळजी!

मुंबई (वृत्तसंस्था) पावसाळा सुरु होताच, सोबत येते विविध आजाराची साथ. पावसाचे पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूची रुग्णसंख्याही वाढल्याचे दिसते. कोरोनातून काहीसा दिलासा मिळत असतानाच, आरोग्य यंत्रणेसमोर डेंग्यूच्या रुपाने नवे आव्हान उभे राहिले आहे.
डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. हा डेंग्यू कसा होतो. त्यापासून कसा बचाव करावा, याबाबत जाणून घेऊ या..
▶️ डेंग्यू म्हणजे नेमकं काय?
रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होणारा डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्यानं डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरविण्यास कारणीभूत असते. प्रामुख्यानं NS-1, Igm आणि IGG या तीन चाचण्यांतून डेंग्यूचं निदान होते.
▶️ डेंग्यूची प्रमुख लक्षणे
▪️ अचानक आलेला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि प्रामुख्यानं सांध्यांमध्ये वेदना होणं.
▪️ शरीरावर पुरळ येणं, नाकातून किंवा दातातून, लघवीद्वारे लक्षणं दिसल्यास हा प्रकार गंभीर आहे, असं समजावं.
▶️ उपचार आणि काळजी
▪️ डेंग्यूवर ठराविक उपचार वा औषध उपलब्ध नाही; पण वेळीच उपचार झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविता येते.
▪️ रुग्णाला लक्षणांनुसार औषधं दिली जातात. ताप किंवा अंगदुखीवर औषधं दिली जातात.
▪️ रुग्णाने विश्रांती घेणे ही सर्वांत गरजेचे, तसेच भरपूर पाणी प्यावे, साधा आहार घ्यावा.
▪️ शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होऊ देऊ नका.
▶️ डेंग्यूच्या अळींचा अटकाव असा करावा
▪️ परिसर स्वच्छ असणे, सर्वात महत्त्वाचं आहे.
▪️ घरात एसी, फ्रीजखाली पाणी साचू देऊ नका
▪️ परिसरात, घरावर पावसाचे पाणी साचू देऊ नका.