प्लॅटफॉर्म तिकिटावर करू शकता ट्रेनमध्ये प्रवास!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म तिकिट हे 2 ते 3 तासांसाठी वैध असते म्हणजेच प्लॅटफॉर्म तिकिट घेतलेले असले तरी 2 ते 3 तासांपेक्षा अधिक वेळ रेल्वे स्टेशनवर थांबता येत नाही.
▪️ रेल्वे ने दिलेल्या माहितीप्रमाणे – तुमच्याकडे केवळ प्लॅटफॉर्म तिकिट आहे आणि अचानक रेल्वे सुरू झाली तर घाबरण्याचं कारण नाही –
▪️ अशावेळी टीसीला प्लॅटफॉर्म तिकिट दाखवून तुम्हाला जो प्रवास करायचा त्याचं तिकिट घेता येते, रेल्वेच्या नियमांनुसार आपतकालीन स्थितीत प्लॅटफॉर्म तिकिटचा उपयोग करुन प्रवास करता येतो.