इंटरनेटशिवायही तुम्ही UPI वरून करू शकता पेमेंट!

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पेमेंट भरण्याची व्यवस्था दिलेली असते.
मागील काळापासून यूपीआयवरून पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र यूपीआयवरून पेमेंट करताना अनेकदा स्लो इंटरनेट किंवा नेट कनेक्टिव्हिटीचा सामना करावा लागतो. इंटरनेटच्या समस्येमुळे UPIवरून पेमेट होत नाही.
आता तुम्ही इंटरनेटशिवायही UPIवरून पेमेंट करू शकता. ऑफलाईन पेमेंट करण्यासाठी एक USSD कोड असतो.
तो तुम्ही फोनच्या डायलरवरून अॅक्सेस करू शकता. ही सेवा सर्व मोबाईल युझर्ससाठी उपलब्ध आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये नेट कनेक्टिव्हिटीची गरज नसते.
USDD ज्याबाबत आम्ही येथे सांगत आहोत. तो *99# हा आहे. म्हणजेच तुम्हाला इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करायचे असेल तर तुम्हाला फोनमध्ये जाऊन *99# डायल करावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर एक मेनू येईल. यामध्ये तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी सेंड मनीचा पर्याय दिसेल. सेंड मनीचा पर्याय ऑप्शन नंबर १ वर असतो. त्यामुळे तुम्हाला १ लिहून USDD वर रिप्लाय द्यावा लागेल.
म्हणजेच तुम्हाला १ लिहावं लागेल आणि सेंड पर्यायावर क्लिक करावं लागेल.
येथे पुन्हा अनेक पर्याय तुमच्यासमोर दिसतील. यामध्ये कुणाचा मोबाईल क्रमांक, यूपीआय, बँक अकाऊंटवर पैसे पाठवण्याचा पर्याच मिळेल. त्यामधील ज्या पर्यायावर पैसे पाठवायचे असतील तो पर्याय सिलेक्ट करा.
त्यानंतर तुम्ही निवडलेल्या पर्यायाच्या हिशोबाने पैसे रिसिव्ह करणाऱ्याच्या बँक अकाऊंट, यूपीआय आयडी किंवा मोबाईल क्रमांक देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला पेमेंटबाबत रिमार्क द्यावा लागेल.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!