केंद्र सरकारचे तीन मोठे निर्णय;लाखो तरुणांना मिळणार रोजगार!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने आज तीन महत्वाचे निर्णय घेतले. कॅबिनेट बैठकीत एकूण 26058 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली. टेलिकॉम सेक्टरसाठी मदत पॅकेज, वाहन आणि ऑटो कंपोनेंट सेक्टरसाठी पीएलआय योजना व ड्रोनसाठी पीएलआय योजनेला मंजुरी देण्यात आली.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी टेलिकॉम कंपन्यांसाठी पॅकेज मंजूर केल्याची माहिती दिली. केंद्राकडून पॅकेज मंजूर होताच, टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी दिसून आली. भारती एअरटेलचे शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. व्होडाफोन-आयडिया कंपनीलाही या निर्णयाचा मोठा फायदा झाल्याचे दिसून आले.
इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन फ्युअलवर चालणाऱ्या वाहन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने उत्पादनाशी निगडीत लाभांश देण्याची घोषणा केली. मात्र, त्यात सीएनजी, पेट्रोल, डिझेल वाहने बनविणाऱ्या कंपन्यांना लाभ मिळणार नाही. नवीन ‘पीएलआय’ योजना 2023 पासून सुरु होईल. पुढील पाच वर्षांसाठी ती सुरु राहील.
▶️ 7 लाख लोकांना रोजगार मिळेल
देशाच्या एकूण जीडीपीत ऑटो सेक्टरची भागीदारी 7.1 टक्के असून, ते 12 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचं लक्ष्य आहे. कार निर्मिती उद्योगाला मोठं बळ मिळणार आहे. त्यातून 7 लाख 7 हजार लोकांना रोजगार मिळण्याचीही आशा आहे. देशात परदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल, असेही ठाकूर म्हणाले.