कोरोनामुळेच मृत्यू ; गाईडलाईन्स जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अनेक फायदे होतात तसेच सरकारी योजनांचा देखील फायदा होतो, मात्र एखाद्या व्यक्तीचा कोरोनामुळेच मृत्यू झाला असे केंव्हा मानले जाईल.याबद्दल काल केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.
▶️ अशा आहेत गाईडलाईन्स:
या गाईडलाईननुसार आरटीपीसीआर, मॉलिक्यिुलर, रॅपिड अँटिजेन टेस्टद्वारे कोरोना संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले – तर तो कोरोना रुग्ण असल्याचे मानले जाईल.
तसेच कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरच्या 30 दिवसांत जर त्या रुग्णाचा मृत्यू झाला तर तो कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे मानले जाणार आहे कारण सरकारने सांगितले की, 95 टक्के कोरोना मृत्यू हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या 25 दिवसांतच होतात.मात्र, जर एखाद्या कोरोना रुग्णाचा या काळात विष प्राशन करून, आत्महत्या करू किंवा हत्या वा अपघाती मृत्यू झाल्यास ती कोरोना डेथ नसेल.
जर मृताचे नातेवाईक डेथ सर्टिफिकेटवरील कारणाने समाधानी नसतील.तर जिल्हा स्तरावरील कमिटी मृत्यूचे प्रमाणपत्र जारी करेल. यामध्ये एडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर, तसेच मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपल आदी असतील.