ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निवृत्ती पाटील प्रथम क्रमांकाने सन्मानित!

सुरत,गुजरात (प्रतिनिधी) अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्र यांच्या संस्थेचे संस्थापक शि. अंकुश भाऊ कुमावत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त ही राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती.
ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सुरत-गुजरात येथिल सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती देविदास पाटील यांनी सहभाग घेऊन प्रथम पारितोषिक मिळवल्या बद्दल संस्थापक अध्यक्ष अंकुश भाऊ कुमावत व महाराष्ट्र उपाध्यक्ष आदित्य भाऊ पवार यांनी निवृत्ती देविदास पाटील यांचा ऑनलाईन सन्मानपञ देऊन गौरव केला, त्या बद्दल निवृत्ती देविदास पाटील यांचे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे.