कोरोना रुग्णांसाठी ‘प्लाझ्मा थेरपी’ उपचारपद्धती बंद!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्लाझ्मा थेरपी.. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील ‘अँटी बॉडीज’ गंभीर रुग्णांना देण्याची उपचारपद्धती होती,मात्र एम्स (AIIMS) आणि आयसीएमआर (ICMR) यांनी ‘प्लाझ्मा थेरपी’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल टास्क फोर्सच्या बैठकीत ‘प्लाझ्मा थेरपी’ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, 11,588 रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरपी’ केल्यावर असे आढळले की,कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत या उपचार पद्धतीने काहीच फरक पडला नाही.
▶️ ‘प्लाझ्मा थेरपी’ बंद करण्यामागील कारणे
▪️बीजेएममध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून, ‘प्लाझ्मा थेरपी’चा फायदा नसल्याचे समोर आले.
▪️’प्लाझ्मा थेरपी’ महाग असून, त्यामुळे भीती निर्माण होत आहे.
▪️आरोग्य यंत्रणेवर विनाकारण ओझे वाढले असून, रुग्णांना काहीच मदत होत नाही.
▪️दात्याच्या ‘प्लाझ्मा’च्या गुणवत्तेची हमी दिली जात नाही.
▪️’प्लाझ्मा’ अँटीबॉडी पुरेशा संख्येने असणे आवश्यक आहे, परंतु हे निश्चित नसते.
▪️’प्लाझ्मा थेरपी’चा तर्कहीन आणि अवैज्ञानिक उपयोग होत होता.
▪️मार्गदर्शक तत्त्वे आणि पुराव्यावर आधारित ही पद्धती नाही.
‘प्लाझ्मा थेरपी’ बंद करण्याबाबत काही डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांना पत्र पाठवले होते. त्यानुसार अखेर ही उपचार पद्धती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.