बुधवार,19 मे 2021

▶️ लहान मुलांना मिळणार कोरोनाची लस; कोव्हॅक्सिनची चाचणी दोन आठवड्यात होणार सुरू, 2 ते 18 वर्षांच्या 525 मुलांना दिली जाईल लस

▶️ केंद्राला येत्या अडीच महिन्यांत 16 कोटींहून अधिक डोस मिळतील; 45 वर्षांवरील लोकांसाठी ते राज्यांना पाठवले जातील, राज्यांना दोन आठवड्यांचे नियोजन शक्य

▶️ महाराष्ट्रात 4,19,727 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 49,27,480 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 83,777 रुग्णांचा मृत्यू

▶️ गडचिरोलीत वाघाच्या मुक्तसंचारामुळे भीतीचे वातावरण; एका आठवड्यात तीन महिलांना वाघाने बनवले भक्ष्य

▶️ केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवल्याने शरद पवारांनी व्यक्त केली तीव्र नाराजी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी केंद्रीय मंत्री गौडा यांना लिहिले पत्र

▶️ पुण्यातील चाकण येथे भरदिवसा एका युवकाला 6 जणांनी बेदम मारहाण करत केली हत्या, टँकरने पाणीपुरवठा करण्यावरून झाला वाद

▶️ भारतात 32,21,838 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 2,19,79,568 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 2,83,276 रुग्णांचा मृत्यू

▶️ राज्यात दैनंदिन 3 हजार मेट्रिक टन प्राणवायूची लवकरच निर्मिती होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहीती

▶️ दिल्लीसाठी केजरीवाल 72 लाख लोकांना मोफत रेशन देणार; संक्रमणामुळे मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांना 50 हजारांची भरपाई देणार

▶️ भारतासारख्या देशात लसीकरण मोहीम 2-3 महिन्यात संपणे सध्या शक्य नाही, जगात लसीकरण पूर्ण व्हायला 2 ते 3 वर्ष लागतील; अदर पुनावाला यांचं निवेदनात मत

▶️ चित्रपट सृष्टीमधील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली लग्नबंधनात; दुबईत साध्या पद्धतीने साजरा केला विवाह सोहळा

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!