ही अभिनेत्री दुबईमध्ये अडकली विवाह बंधनात!

मुंबई (वृत्तसंस्था) मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपला विवाह करून आश्चर्याचा धक्का दिला असून,स्वतः फोटो शेअर करून याबाबत तशी माहिती दिली आहे.दुबई येथे सोनाली ने कुणाल सोबत लग्न केले आहे. याबाबत सोनाली म्हणाली की,आम्ही जून मध्ये युकेला लग्न करणार होतो,मात्र युकेला आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लग्न पुढे ढकलावे लागले.नंतर व्हेन्यूच्या उपलबद्धतेनुसार जुलैमध्ये पुढची तारीख ठरली.कुणाल बरोबर बसून लग्नाची तयारी करण्यासाठी मी मार्च मध्ये शूटिंग संपवून दुबईला आले.आणि भारतात कोरोनाची दुसरी लाट आली,आणि मी दुबईत अडकले आणि लग्नबंधनातही!

त्याच झालं असं की एप्रिल मध्ये युकेने भारतीयांसाठी ट्रॅव्हल बॅन केले.यानंतर क्वारंटाईन,प्रवासावरील कुटुंबियांसाठीची रिस्क,एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च,सरकारचे नियम या सर्वांचा विचार करून आम्ही मोठा लग्न समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला.जून महिन्याचे जुलै असं पुढे करण्यापेक्षा म्हटलं जुलैच मे करू अन् सर्वांना सुखद धक्का देऊ! असे सोनालीने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
