प्रजाराज्य न्यूज हेडलाईन्स

गुरुवार, 20 मे 2021
▶️ आता शेतकऱ्यांना खताच्या प्रत्येक गोणीमागे 500 रुपये अनुदानाऐवजी तब्बल 1200 रुपये अनुदान मिळणार, यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक गोणी मागे 2400 रुपयांऐवजी आता 1200 रुपये द्यावे लागणार; केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
▶️ महाराष्ट्रात 4,01,695 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 49,78,937 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 84,371 रुग्णांचा मृत्यू
▶️ ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा 1500 कायम प्रवासभत्ता देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय
▶️ ऑपरेशन ब्लॅक टॉरनेडोच्या नायकाचे निधन; मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यादरम्यान ऑपरेशन लीड करणारे NSG चे माजी चीफ जेके दत्त यांचे कोरोनाने निधन
▶️ परवानाधारक रिक्षाचालकांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा होणार; सरकारच्या निर्णयाची 22 मे पासून होणार अंमलबजावणी
▶️ राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था महाराष्ट्रात स्थापनेला मंजुरी, आडाळी येथे 50 एकर जागा दिली जाणार
▶️ भारतात 31,27,640 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 2,23,44,007 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 2,87,101 रुग्णांचा मृत्यू
▶️ महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींचं कथित गैरव्यवहार प्रकरण, खटला दुसरीकडे वर्ग करण्याची मागणी करत अर्ज
▶️ मुंबईत 60 दिवसात सर्वांच्या लसीकरणाची तयारी; बीएमसीने लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढले, एक कोटी लसी आयात करण्याचा निर्णय