रशियाची स्पुतनिक व्ही लस भारतात दाखल; किंमत व वैशिष्ट्य जाणून घ्या!

मुंबई (वृत्तसंस्था) सध्या देशात कोरोना लशींचा पुरवठा अपूरा असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण थांबविण्यात आलं आहे. दरम्यान नागरिकांसाठी एक चांगले वृत्त समोर आले आहे.
प्रतिक्षेत असलेल्या स्पुतनिक व्हीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीची संख्या वाढल्याने देशात सर्व नागरिकांना वेळेत लसीचे डोस घेता येईल,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
रशियाच्या स्पुतनिक व्हीचं लसीकरण देशात सुरू करण्यात आलं असून पहिला डोस शुक्रवारी हैद्राबाद येथे देण्यात आला. भारतात स्पुतनिकची आयात करणाऱ्या डॉ. रेड्डींज लेबोरेटरीने याबाबत माहिती दिली,त्यांनी सांगितलं की,1 मे रोजी भारतात दाखल झालेल्या स्पुतनिक व्हीच्या लशीच्या आयातीतील पहिल्या डोसला 13 मे रोजी हिमाचल प्रदेशच्या कसौली येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून नियामक मंजुरी मिळाली आहे.
▶️ किती आहे किंमत?
स्पुतनिक व्ही लशीचा स्थानिक पुरवठा सुरू झाल्यावर लस आयात केलेल्या डोसची किंमत सध्या 948 रुपये आहे. यावर 5 टक्के जीएसटी लागेल. येत्या काळात स्थानिक सप्लाय सुरू झाल्यानंतर यात घट होण्याची शक्यता आहे.
▶️ किती आहे प्रभावशाली?
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या उत्पादित दोन कोविड लशींच्या तुलनेत स्पुतनिक व्हीची लस 91.6 टक्के अधिक कार्यक्षम आहे.
पुढच्या आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अशी माहिती गुरुवारी केंद्राने दिली.
विविध राज्यांत सध्या लशींची कमतरता दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान आणखी एक लस दाखल झाल्याने पुन्हा एकदा परिस्थिती सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.