स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान तर्फे छत्रपती संभाजीराजे भोसले यांची जयंती साजरी!

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान तर्फे छत्रपती संभाजीराजे भोसले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली.
नगरसेवक मयूर भाऊ कलाटे पाटील यांचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान,छत्रपती संभाजीराजे चौक येथे उमरगा जिल्हा उस्मानाबादचे माजी सरपंच रामभाऊ सूर्यवंशी यांच्या हस्ते संभाजीराजे फलकाचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रा.पुरु पाटील सर,प्रा.विजय पाटील सर,शिवप्रेमी पांडुरंग शेडगे,संदीप माने,विनोद शेळके,संदीप पारखी,राहुल पाटील,भरत पाटील,भरत सूर्यवंशी,बसवराज रेड्डी,संजय काळे,रावसाहेब देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
