होमिओपॅथी मूळची भारतीयच।

होमिओपॅथी मूळची भारतीय आहे असे म्हटल्यावर आपणास आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही.श्रीमद भागवतच्या पाचव्या स्कंदमध्ये 32 व्या श्लोकात असे म्हटले आहे की’ ,’एखादा पदार्थ खाल्याने शरीरात आजार( लक्षणे) निर्माण झाला असल्यास तोच पदार्थ अति सूक्ष्म प्रमाणात रोग्याला दिल्यास’ती लक्षणे किंवा तो आजार पूर्णपणे बरा होतो.तसेच ज्ञानेश्वरीत चौथ्या अध्यायात 22व्या ओवीत असा उल्लेख आढळतो की, जर दुग्ध शर्करेचा घोट घेतल्यावर जर मोठ मोठे आजार बरे होत असतील तर कडू औषधाची घोट घ्यायची गरज काय?.तसेच चरक संहितेत सुक्ष्म आयुर्वेदाचा जो उल्लेख आढळतो तो म्हणजेच होमिओपॅथी संदर्भात आहे. रामायणाच्या एका प्रसंगात लक्ष्मण जेंव्हा बेशुद्ध होतो तेव्हा हनुमान जी संजीवनी आणतो त्याचा उल्लेख होमिओपॅथीत ,’चैतन्य शक्ती’ म्हणून आढळतो.अजून आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे आणि ती म्हणजे “काट्याने काटा काढणे”,होमिओपॅथीत सुद्धा असाच सिद्धांत आहे.,’सम-समया-संयंती’.थोडक्यात ‘टू सिमिलियर मीट, नॅलिफाय इच ऑदर’.याचा अर्थ असा की, दोन समान सक्ती एकत्र आल्यावर दोघीही नष्ट होतात. किंवा काट्याने काटा काढणे वा लोह लाहे को कटाता है.
असो आज होमिओपॅथी चे जनक डॉ.सॅम्युअल हैनिमान यांचा जन्म दिवस असून त्यांची 266 वी जयंती जग साजरी करत आहे.आज त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जग जागतिक होमिओपॅथी दिवसही साजरा करत आहे.डॉ हैनिमान हे मूळचे अलोपॅथी शास्त्रचे एम .डी.होते.एलोपॅथीचे औषध विष असून ते लोकांना देऊन लोकांकडून पैसे कमावून आपले मुले कशाला पोसायचे असे म्हणून आपला डॉक्टरी व्यवसाय बंद करून इतर भाषेतील पुस्तके जर्मन भाषेत भाषांतर करायचे त्यांनी ठरवले.असेच प्रोफेसर कलेन यांचा मूळ लॅटिन भाषेतला एक ग्रंथ (मटेरिया मेडिका) भाषांतरित करीत असताना त्यांना एक असा संदर्भ सापडला ज्यात म्हटले होते की, ‘सिंकोना बारक हे औषध निरोगी माणसाला दिल्यास त्याला मलेरिया सदृश असे लक्षणे दिसून येतात,आणि मलेरियाच्या रुग्णाला हेच सिंकोना बारक ‘दिल्यास त्याचा मलेरिया बरा होतो. डॉ .हैनिमान यांनी सदरचा प्रयोग स्वतःवर करून पाहिला असता त्याचा प्रत्यय त्यांना आला. त्यावर त्यांनी असे चिंतन केले की जर निसर्ग निर्मित सिंकोना मध्ये हे गुणधर्म असतील तर इतरही ही वनस्पती आणि निसर्ग निर्मित घटकांमध्ये हे गुणधर्म असायलाच हवेत.या प्रमाणे त्यांनी स्वतःवर आणि अन्य निरोगी माणसांवर असे प्रयोग सुरू केले असता त्यांना संपूर्ण होमिओपॅथीचाच शोध लागला. डॉ.हैनिमान यांनी त्यांच्या ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन या ग्रंथाच्या पहिल्याच परेग्राफ मध्ये डॉ.हैनिमान हे होमिओपॅथीक वैद्यला त्याचे मुख्य कर्त्यव्यांची जाणीव करून देतांना सांगतात की ‘रोग्याचा आजार हा सौम्य,जलद, त्याला परवडेल असा आणि कायमचा दुरुस्त करणे ‘.असा सिद्धांत सांगितला असला तरी या सिद्धांता पासून अनेक होमिओपॅथी डॉक्टर भरकटले आहेत किंवा त्या पासून फार दूर तरी गेले आहेत.डॉ.हैनिमान यांनी आपले संपूर्ण आयुष्य होमिओपॅथीवर खर्ची घातले,होमिओपॅथीच्या कोणत्याच अभ्यासक्रमात ऑलिपॅथी चा अभ्यासक्रम शिकवला जात नाही तरीही काही धूर्त राजकारणी होमिओपॅथीक डॉक्टरांना अॅलोपॅथीचा वापर करू दयावा यासाठी आग्रही असल्याचे चित्र दिसते,तसेच डॉ.हैनिमान यांनी शिंगल ‘रेमेडी सिंगल डोस’. आणि औषधांचे नावे हे ज्या वनस्पतींपासून औषध बनवलेले असेल त्या वनस्पतीचे लॅटिन भाषेतील नाव हेच औषधाचे नाव घ्यावे हे सूत्र सांगितले असतांना बाजारात मात्र खुशाल आजारांच्या नावाने आणि नंबर चे 5 ते 6 होमिओपॅथीचे औषधे एकत्र केलेले औषधे विकले जातात.त्याचे घातक परिणाम शरीरावर दिसून येतात.ही आजची मोठी शोकांतिका आहे.आज मूळच्या डॉ.हैनिमान यांनी सांगितलेल्या सुत्रांपासून होमिओपॅथी डॉक्टर भरकटला आहे एवढेच!. 266 व्या जयंती निमित्त डॉ.हैनिमान यांना विनम्र अभिवादन.
✍? डॉ.योगेश हिंमतराव सूर्यवंशी.
तज्ञ होमिओपॅथीक,
चैतन्य होमिओ रिसर्च सेंटर,धुळे.महाराष्ट्र.