स्वर्गीय मातोश्री विमलबाई काटे यांना पुण्यस्मरणची अनोखी श्रद्धांजली !

▶️ रक्तदान करून पांग फेडण्याचा प्रयत्न ; कोळपिंप्रीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
पारोळा (प्रतिनिधी) “गे मायभू तुझे मी… फेडीन पांग सारे… आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे!” या काव्यपंक्तीच्या पार्श्वभूमीवर येथील काटे बंधूनी आपली स्वर्गीय मातोश्री विमलबाई काटे यांच्या पुण्यस्मरण निमित्त रक्तदान करून पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शिवशाही फाउंडेशन च्या माध्यमातून गरीब- गरजू शेतकरी व शेतमजुरांच्या मुलामुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करून अनोख्या पध्दतीने आईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना (कै) विमलबाई प्रतापराव काटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त शिवशाही फाऊंडेशन (अमळनेर) यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. जेष्ठ नागरिक शिवदास काटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष काटे, अमृतराव पाटील, गिरीश काटे, संजीव पाटील, पांडुरंग काटे, प्रफुल्ल काटे, मच्छिंद्र पाटील, छबिलदास भिल, सुभाष पाटील, रावसाहेब काटे, गुलाब काटे, जितेंद्र काटे, प्रशांत काटे, शिवशाही फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे, दिलीप पाटील, भाऊसाहेब काटे, नानाभाऊ पाटील, उदय पाटील, रमेश पाटील, बाळू पाटील, उत्तम पाटील, सुनिल काटे, सुभाष पाटील, प्रशांत पाटील, डॉ विजय काटे, शिवशाही फाउंडेशन चे सचिव उमेश काटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम चौधरी, प्राथमिक शिक्षक सुनिल एम. काटे , संजय पाटील व रमेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून आईवडिलांचे स्मरण करून त्यांचे ऋण निर्देश करणे ही काळाची गरज असल्याचे ही सांगितले. उमेश काटे यांनी प्रास्ताविक केले. आत्माराम चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान अपघातात अनेक रुग्ण जखमी होतात, त्यांना रक्ताची नितांत गरज असते या पार्श्वभूमीवर जयेशकुमार काटे व उमेश काटे यांनी जीवनश्री रक्तपेढी येथे जाऊन रक्तदान केले. त्यांच्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना रक्त मिळणार आहे.

