आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याने पुरवणी अर्थसंकल्पात २८ कोटी रूपयांचा कामांना मंजुरी!

पारोळा (प्रतिनिधी) मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासुन खराब असलेल्या रस्त्यांमुळे रहदारी करणाऱ्या नागरीकांसह स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्त्यांचा झालेल्या दुरावस्थेमुळे शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या समस्यांना दैनंदिन नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरीकांची देखील मोठी गैरसोय होतांना दिसत होती. रस्त्यांसह पुलांअभावी पावसाळ्यात गावांचा संपर्कच तुटत होता. त्यात प्रामुख्याने पारोळा तालुक्यातील लोणी सिम, लोणी बु, लोणी खु, मोंढाळे प्र.अ. व करमाड या गावांना पुलाची नितांत आवश्यकता भासवत होती. यासाठी आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने पाठपुरावा पुरावा करित होते. या पाठपुराव्यानेच सद्या मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्प जुलै २०२३ अंतर्गत एकुण २८ कोटींच्या रस्त्यांचा व पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे रस्त्यांचा व पुलांच्या दुरावस्थेमुळे उद्भवणाऱ्या दैनंदिन समस्यांना पुर्णविराम लागणार आहे.
२८ कोटींच्या मंजुर कामांत पारोळा तालुक्यातील भोंडण गावाजवळ पुलाचे बांधकाम करणेसाठी – १.५० कोटी, तालुका हद्द ते ढोली दरम्यान पुलाचे बांधकाम करणेसाठी – २ कोटी, उंदीरखेडे गावाच्या पुढे पुलाचे बांधकाम करणेसाठी – १.५० कोटी, लोणी बु, लोणी सिम व लोणी खु या गावांना जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी – १.३० कोटी, मोंढाळे प्र.अ. येथे गावांना जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी – १.५० कोटी, करमाड कुंझर रस्त्यावर करमाड गावाजवळ पुलाच्या बांधकामासाठी – २ कोटी व चोरवड – आंचळगांव रस्त्यावर आंचळगांव गावाजवळ पुलाच्या बांधकामासाठी – १ कोटी, एरंडोल तालुक्यातील रिंगणगांव ते खर्ची दरम्यान खराब लांबीच्या दुरुस्तीसाठी – ७५.०० लक्ष, एरंडोल ते विखरण रस्त्यावरील लहान पुलाच्या बांधकामासाठी- १.२० कोटी, खर्ची ते नागदुली कडे जाणाऱ्या रस्त्यावरील लहान पुलाच्या बांधकामासाठी – ७५.०० लक्ष, तळई ते उत्राण मध्ये लहान पुलाच्या बांधकामासाठी – २.०० कोटी व एरंडोल शहरातील धरणगांव चौफुली ते टोळी गावापर्यंत मोरी बांधकामासह रुंदीकरणासाठी – ३ कोटी, भडगांव तालुक्यातील अंजनविहीरे ते गिरड रस्त्यावर गिरड गावात काँक्रीट गटार बांधकामासाठी- १.५० कोटी, पिंपरखेड ते अंजनविहीरे रस्त्यावरील अंजनविहीरे गावाजवळ पुलाच्या बांधकामासाठी – २.५० कोटी, पिंपरखेड ते आंचळगांव रस्ता रुंदीकरण करणेसाठी – १.५० कोटी, आमडदे ते आंचळगांव रस्त्यावर पाईप मोऱ्यांच्या बांधकामासाठी – १.०० कोटी, धोत्रे गावाजवळ लहान पुलाच्या बांधकामासाठी – १.५० कोटी, आमडदे गावाजवळ लहान पुलाच्या बांधकामासाठी – १.५० कोटी या कामांचा समावेश आहे. या पुलांच्या व रस्त्यांच्या कामामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांसह स्थानिक ग्रामस्थांचा याचा मोठा फायदा होणार आहे.