व्हॉट्सअपला लागलेले ग्रहण; सुटले पावणे दोन तासाने!

मुंबई (वृत्तसंस्था) ऐन दिवाळीत व्हॉट्सअपचे मेसेज येणं-जाणं बंद झाल्यामुळे नेटकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. दुपारी 12.30 वाजेनंतर साधारण व्हॉट्सअपवरील मेसेजेच जाण्याचा स्पीड कमी झाला. सुरुवातीला अनेक ग्रुपवरील मेसेज जाणं आणि येणं बंद झालं. पावणे एक वाजेपर्यंत पर्सनल नंबर्सवर मेसेज जात होते. मात्र १ वाजेनंतर तेदेखील बंद झाले.
दिवाळीच्या सुट्या, दुपारची वेळ व्हॉट्सअपवर आलेल्या शुभेच्छा आणि इतर संदेश वाचण्याच्या मनःस्थितीत असलेल्या नेटकऱ्यांसमोर यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला कुणाला वाटलं आपलंच इंटरनेट डाऊन असेल. अनेकांनी आपला इंटरनेट स्पीड आणि इंटरनेट कनेक्शन सुरु आहे की नाही, हे तपासून पाहिलं. पण काही वेळाने खरा प्रॉब्लेम इंटरनेटला नसून व्हॉट्सअपला आहे हे काही वेळाने समजले.
अनेकांना व्हॉट्सअॅप शिवाय करमत देखील नाही. फोटो, व्हिडीओ आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी व्हॉट्सअॅपवरून सहज शेअर करता येतात. मात्र गेल्या तासाभरापासून देशभरात व्हॉट्सअॅप डाऊन झालं आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप डाऊन झाले होते,शेवटी व्हॉट्सॲप चालू झाल्याने भारतातील 53 कोटी युजर्सना हायसे वाटलं.