स्वप्न उराशी बाळगल्यास मिळते अपेक्षित यश!-उपसंचालक कपिल पवार

0

▶️ अमळनेर तालुक्यात “करियर संवाद वारीला सुरुवात
अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कधीही आपला संयम ढवळून देऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा. यश अन अपयश हे कधीही कायम नसते. काहितरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगल्यास ते अपेक्षित यश निश्चितच पूर्ण होते असे मत नागपूरचे महानगर विकास प्राधिकरण मंडळाचे उपसंचालक कपिल पवार यांनी व्यक्त केले. जवखेडे (ता.अमळनेर) येथे उत्कर्ष खान्देश अधिकारी मंडळ व तालुक्यातील विविध विकास मंचतर्फे “करियर संवाद वारी- थेट आपल्या दारी” या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र खैरनार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, नोबेल फाऊंडेशनचे संचालक जयदीप पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉ. एस ओ माळी, युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील, ए. पी. आय. गोपीचंद नेरकर, आरटीओ स्वप्नील वानखेडे, शरद खैरनार, विजयसिंग पवार, डी ए धनगर, उमेश काटे, सरकारी लेखापरीक्षक प्रशांत पाटील, दिवाकर पाटील, मयूर पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गोंदिया च्या उपजिल्हाधिकारी मानसी पाटील-गांधीले यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. मयूर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून ऐन दिवाळीत तालुक्यातील तरुणांना मार्गदर्शनाची मेजवानी मिळत आहे. तरुणांना करिअर विषयक मार्गदर्शन, एमपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती, वर्ग ३ ची पदे यात तालुक्यातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी ग्रामीण भागात हे मार्गदर्शन केले जात आहे. ही करियर संवाद वारी अंतर्गत मांडळ, जानवे व मंगरूळ येथे परिसरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राजेंद्र पाटील, प्रा संदीप पाटील, चंद्रकांत पाटील, प्रेमराज पवार, मनोहर नेरकर, अमोल पाटील आदींनी सहकार्य केले.
▶️ २३ रोजी या गावात जाणार करियर संवाद वारी
ता.२३ रोजी येथे कन्हेरे येथे सकाळी ८.३०.ते १०.३०, दहिवद येथे सकाळी ११ ते दुपारी १, पातोंडा येथे दुपारी २ ते ५, खेडी प्रज येथे सायं. ६ ते ९, सोमवारी (ता२४) भरवस येथे सकाळी ८ ते.१०.३०, सानेनगर येथे सकाळी ११ ते १, करणखेडे येथे दुपारी २ ते ५, मंगळवारी (ता.२५) मारवड येथे सकाळी ८.३० ते १०.३० असे या कार्यक्रमाचे नियोजन असून मारवड येथे कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या करियर संवाद यात्रेत विद्यार्थ्यांनी हजेरी लावत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्कर्ष खान्देश अधिकारी मंडळ व तालुक्यातील विविध विकास मंचांतर्फे करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!