प्रजाराज्य न्यूज- आजच्या हेडलाईन्स!

0

शुक्रवार,एप्रिल 2021

▶️ महाराष्ट्रात 5,21,317 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 26,49,757 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 57,028 रुग्णांचा मृत्यू

▶️ भारतात 9,74,233 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,19,10,741 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,67,694 रुग्णांचा मृत्यू

▶️ आयपीएल 2021 : आज गतविजेत्या मुंबई इंडियन्सची रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुशी गाठ; वेळ : सायंकाळी 7.30 वा. , थेट प्रक्षेपण- स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

▶️ रिक्षा -टॅक्सी-बस प्रवासाला सरकारने मुभा दिली मात्र पंक्चर काढणारी गॅरेज, गाड्यांचे सुटे पार्ट विकणारी दुकाने बंद ठेवली; “आम्ही सर्व नियम पाळू मात्र व्यापार करण्यास परवानगी मिळावी”, अशी व्यापाऱ्यांची मागणी

▶️ लसीकरण करण्यासाठी 11 ते 14 एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन

▶️ गरिबीत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या भारतातील गरिबांच्या संख्येत, 45 वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या वर्षभराच्या काळात सर्वाधिक भर

▶️ वाळुंज: औरंगाबाद-पुणे रस्त्यावर रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट होऊन रुग्णवाहिकेचे स्पेअरस्पार्ट्स 200 फूट लांब उडाले; डॉक्टर व चालक बालंबाल बचावले

▶️ रेमडीसीवीरचा काळा बाजार होऊ नये म्हणून इंजेक्शनवरील एमआरपी कमी करावी; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

▶️ बीड : नागापूर येथील बंद जिनींगमधील देशी दारूच्या बनावट कारखाण्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; छाप्यात 6 आरोपींना अटक, कारवाईत 86 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

▶️ पुणे: कोरोना प्रतिबंधक लस संपल्याने पिंपरी-चिंचवडमधील लसीकरण केंद्रे शुक्रवारी (आज) बंद ठेवण्यात येणार; महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले स्पष्ट

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!