प्रजाराज्य न्यूज आजच्या हेडलाईन्स!

0

शनिवार, 10 एप्रिल, 2021

▶️ राज्यात वीकेंड लॉकडाऊन नाही तर, तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून व्यक्त; मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत याविषयी आपण भूमिका मांडली असल्याची देखील दिली माहिती

▶️ पश्चिम बंगालमध्ये आज होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदानात 382 उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशिनमध्ये सीलबंद होणार; एकूण 44 जागांसाठी होणाऱ्या मतदानात अनेक दिग्गजांचे भवितव्य लागणार पणाला!

▶️ केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोरखरियाल निशंक यांच्याकडून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात नवीन शिक्षण धोरणाची उद्दिष्ठे राबवण्यासाठी ‘सार्थक’ योजना जाहीर

▶️ नागपूरच्या मध्य रेल्वेचे तब्बल 650 कर्मचारी कोरोनाग्रस्त; 30 रेल्वे मध्येच तयार केले क्वारंटाईन सेंटर, राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचे थैमान कायम!

▶️ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून आयपीएलच्या 14 व्या हंगामाचा पहिला सामना खेळताना, टी 20 सामन्यात 6000 धावा करणारा विराट ठरला पहिला कर्णधार; आपल्या नावे केला अनोखा विक्रम

▶️ अभिषेक बच्चन याचा ‘द बिग बुल’ सिनेमा हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित; सिनेमातील अभिषेकचे काम पाहून पिता अमिताभ बच्चन झाले भावूक!

▶️ नागपुरातील वेल ट्रीट या कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयाला एसीमुळे शुक्रवारी रात्री लागली आग; आगीत 3 जणांचा मृत्यू तर इतर रुग्णांना बाहेर सुखरूप काढण्यात अग्निशमन यंत्रणेला यश!

▶️ ब्रिटनची महाराणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिंस फिलीप यांचं वयाच्या 99 व्या वर्षी निधन; रॉयल फॅमिली कडून ट्विटरद्वार माहिती प्रसिद्ध

▶️ कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सची आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात ‘विराट’ खेळी; मुंबईने दिलेले 160 धावांचे आव्हान 2 गडी राखून पूर्ण करत दिली विजयी सलामी!

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!