प्रजाराज्य न्यूज- हेडलाईन्स !

गुरुवार, 8 एप्रिल 2021
▶️ सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, मात्र नियम पाळण्यात सहकार्य हवे; लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती, म्हणून सर्व जनतेला आधीच सावध करत होतो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
▶️ अँटिलिया प्रकरण : “मी बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, हे सगळं खोटं आहे”, अनिल परब यांचे स्पष्टीकरण
▶️ दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार, वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही, एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शिक्षण विभाग निर्णय घेणार
▶️ महाराष्ट्रात 5,01,559 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 26,13,627 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 56,652 रुग्णांचा मृत्यू
▶️ भारतात 9,05,021 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,18,48,905 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,66,892 रुग्णांचा मृत्यू
▶️ फोर्ब्ज: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी चिनी उद्योगपती जॅक मा यांना मागे टाकून बनले आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती; अब्जाधीशांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर
▶️ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाणला वरिष्ठांकडून 1-2 नाही तर तब्बल 27 कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या; वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक छळ.
▶️ प्रवासी मजुरांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची भीती, मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर प्रचंड गर्दी; सरकारने ट्रेनची संख्या वाढवली, लोक हजारोंच्या संख्येने गावाकडे निघणार
▶️ “एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला फटका बसला”, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र
▶️ धार्मिक भावना दुखावण्याचं स्वातंत्र्य अभिव्यक्तीच्या अधिकारात नाही; एका खटल्यादरम्यान हायकोर्टाचा निर्णय