राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत,त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे चौकशी सुरू राहणार आहे. या निर्णयामुळं अनिल देशमुख प्रकरणी सीबीआय तपास कायम राहणार आहे.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. एक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वतीने तर दुसरी राज्य सरकारच्या वतीनं याचिका दाखल केली होती. देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करुन हे आरोप गुन्हा दाखल करण्यायोग्य आहेत की नाहीत याबाबत 15 दिवसांची मुदत हायकोर्टाने सीबीआयला दिली आहे.